स्वामी excerpt

From SandeepPurao

Jump to: navigation, search

From स्वामी byरणजित देसाई

     "या बापू, अाम्ही अापलीच वाट पाहत होतो."
     बापू थक्क होऊन समोरच दृश्य पाहत होते. धुराचा माधवरावांना त्रास होत होता. ते ठसकत होते. न राहवून बापू म्हणाले,
     "श्रीमंतांनी काय योजलं अाहे? विश्रांती घ्यायला सांगितली असता हे कष्ट घ्यायची काय जरुरी होती? एवढी महत्त्वाची बाब होती ही?"
     "महत्त्वाची?" क्षणभर माधवराव नजर वर करत म्हणाले। शेगडीतला कपटा जळत होता. "बापू, अामच्या दरबारी जे निष्ठावंत, इमानी सेवक, सरदार, मानकरी अाहेत, त्यांच्या बेईमानपणाचे पुरावे अाम्ही नष्ट करीत अाहोत."
     "जर हे बेईमानपणाचे पुरावे असतील, तर ते जाळण्याऐवजी त्या बेईमानांना फासावर दिलेलं योग्य होईल."
     असं म्हणता?" असे म्हणत माधवरावांनी उचललेला कागद बापूंच्या हाती दिला. "वाचा बापू."
     बापूंनी कागद समयांच्या जवळ नेला. चाळिशी लावली अाणि तो ते कागद वाचू लागले. पाहता पाहता त्यांचे हात थरथरू लागले. त्यांच्या कपाळी घाम फुटला. खुद्द बापूंनी निजामाला लिहिलेले ते पत्र होते. निजामाकडून मिळालेल्या पैश्यांचा त्यात उल्लेख होता. सखारामबापू वेड्यासारखे ते पत्र निरखित होते.
     "अाणा ते पत्र." माधवराव म्हणाले.
     भारल्यासारखे बापूंनी ते पत्र माधवरावांच्या हाती दिले.
     "सांगा अशा पत्राचं अाम्ही काय करावं? बसा बापू. एवढ्यासाठी अाम्ही तुम्हाला बोलविलं नाही." असे म्हणत माधवरावांनी ते पत्र शेगडीवर टाकले.
     श्रीपतीकडे वळून माधवराव म्हणाले, "श्रीपती बाहेर उभा राहा! कुणाला अात सोडू नको. बापू अाज मला खूप बोलायचं अाहे."
     श्रीपती बाहेर गेला. पलंगावर बसते होत माधवराव म्हणाले,
     "बापू ह्या संदूकीत अशी अनेक पत्र अाहेत. गेल्या दहा वर्षात अनेक गोळा झाली. ह्यात जसे तुमचे-निजामाचे पत्रव्यवहार अाहेत, तशीच काकांची, नागपूरकरांची, इंग्रजांचीही पत्रे अाहेत. त्यांत पटवर्धनांनी निजामाशी केलेली हातमिळवणी अाहे, शिंदे, होळकरांची अाम्हासंबंधीची पत्रं अाहेत. हे सारंच लक्षात ठेवून अाम्ही न्यायाला बसलो, तर ते बरोबर होणार नाही. ही सारी राज्याशी इमानी, निष्ठावंत, प्रसंगी जीव देणारी माणसं अाहेत. केव्हां तरी बुध्दीभ्रंश होतो. अपराध घडतो, म्हणून तेवढं लक्षात घेऊन चालायचं नाही. अाता अामचा भरवसा नाही. काही बरं-वाईट घडण्याअाधी हे पुरावे नष्ट होणं अावश्यक अाहे। नाही तर अामच्या पश्चात् ही पत्र दुसर््या कुणाच्या हाती पडली, तर त्याचे परिणाम भयंकर होतील."

© रणजित देसाई

Personal tools