भिजकी वही excerpt
From SandeepPurao
From भिजकी वही by अरुण कोलटकर
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणाऱ्या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो
© अरुण कोलटकर

