गणगोत excerpt
From SandeepPurao
From गणगोत by पु. ल. देशपांडे
दिनेश
दिनेशची अाणि माझी ओळख होऊन जवळजवळ दोन वर्षे झाली. त्यांहून जास्त होणे शक्यही नाही; कारण दोनतीन महिन्यांपूर्वीच त्याला दोन वर्षे पूर्ण झाली. लहान मुलांत माझी फारशी मैत्री नाही. तसा मी मुलांत मूल फुलांत फूल संप्रदायातला नाही. मला लहान मुलांशी फारसे खेळताही येत नाही. क्वचित प्रयत्न करतो, पण त्या मुलांनाच माझा कंटाळा येत असावा.
...
अशा वेळी दिनेशची मैत्री मला मोठी मोलाची वाटते. अाज दोन वर्षे ही मैत्री टिकून अाहे. कारण नियमितपणे हापिसात किंवा त्याच्या वडिलांसारखा हॉस्पिटलात जाणारांतला मी नाही; केव्हाही घरी असतो. त्याच्याइतका नसला, तरी बराचसा उघडाबंब वावरतो. त्यामुळे स्वत:इतकाच हाही एक घरात नुसता बसून खाणार््यांपैकी अाहे, अशी त्याने काहीशी कल्पना करून घेतली अाहे. हा इसम अापल्याच जोडीला खेळायला अाणून ठेवण्यात अाला अाहे, असा त्याचा समज करून देण्यात त्याच्याहून दोनतीन वर्षांनी थोर असणार््या त्याच्या शुभाताईचाही वाटा अाहे.
© पु. ल. देशपांडे

